आलास नाही तू सख्या
वाटे तुझ्याविना अवस
आलास नाही तू सख्या
झाले किती दिवस
मी मला समजावले
कधी पटले कधी ना जमले
महाल जरी हा माझा
वाटे ना यात रस
कणभर आवाज झाला
तर वाटे तू मज आला
वाढे धडधड मनाची
भरे मग नस नस
ये असा ये माझ्यात
न अंतर तुझ्या माझ्यात
येण्याने तुझ्या बहरेल मी
नसेल मग जीवन नीरस
नेहमीचे तुझे बहाणे
आवडे मज वाट पहाणे
येशील ना रे आता
काय करू नवस
अमित जहागीरदार
१३ जून २०२१
No comments:
Post a Comment