येणार ना साजणा
वाट पहाटे मी तुझी येणार ना साजणा
वाटते मजला कवेत घेणार ना साजणा ।।
दूर कोठे सारंगीचे सूर बेरंग वाटतात
श्वासांचे गीत तुझे ऐकवणार ना साजणा ।।
जळते तुझ्यासाठी होऊनी पतंग दिनरात
विझलेचं जरी आज नभी उगवणार ना साजणा ।।
कित्येकदा मी आशेने ना केले दार घरचेही बंद
एकदा पाहावे तुला भेटलो जरी सरणावर ना साजणा ।।
अमित जहागीरदार
१२ एप्रिल २०२०
(लॉक डाउन मधले पराक्रम)
वाट पहाटे मी तुझी येणार ना साजणा
वाटते मजला कवेत घेणार ना साजणा ।।
दूर कोठे सारंगीचे सूर बेरंग वाटतात
श्वासांचे गीत तुझे ऐकवणार ना साजणा ।।
जळते तुझ्यासाठी होऊनी पतंग दिनरात
विझलेचं जरी आज नभी उगवणार ना साजणा ।।
कित्येकदा मी आशेने ना केले दार घरचेही बंद
एकदा पाहावे तुला भेटलो जरी सरणावर ना साजणा ।।
अमित जहागीरदार
१२ एप्रिल २०२०
(लॉक डाउन मधले पराक्रम)
No comments:
Post a Comment