आसमंतास लाजवेल अशी अपुली प्रीत आहे
मी -तू न भासावे वेगळे, अशी अपुली रीत आहे ।।
मी रंग मागतो फुलांचे केशी तुझ्या माळण्या
विस्कटतील श्वासाने, जरी केशभूषा नीट आहे ||
ये मिठीत ये, मोजणे न होवो अंतर आपल्यातले
रोमांचित होऊ दे अंग, तू तशीच रसरशीत आहे ||
रात्रीस वाटे मोद पाहून प्रीतीचा खेळ आपुला
नसे ठाऊक गुपित, तू दिवसाही तितकीच धीट आहे ||
प्रिये ये अशी बाहुत नको ना एवढ्यात जाऊस
नको ऐकवू आता ओठांनी दे तुझ्या ओठी जे गीत आहे ||
नको मग ते लटके भांडण नको तो वाद आपल्यात
हरलीस तू कि दुःख मला, विजयात तुझ्या जीत आहे ||
अमित जहागीरदार
१३/०४/२०२०

No comments:
Post a Comment