तुझ्याच साठी
तुझ्याच साठी
आले जुळून सारे काही ।
ती दूर डोंगराची रेघ
दाटून येती जिथे मेघ
नदीला त्या तिचे भान नाही ।।
अंगणी सजला मोगरा
बघून तुला तो लाजला
गंध तुझा तो स्वैर वाही ।।
दाट सांडला प्राजक्त
कोवळा अलगद नि मंद
फुलाला पुन्हा तुझ्या हाती ।।
डोळ्यात पाहू तुझ्या किती
हरवतो गवसतो पुन्हा जरी
सापडते तिथेच सारे काही ।।
तनूवर रेंगाळणारा वारा
केसांना तुझ्या कुरवळणारा
वेडावतो असा फिरून दिशा दाही
भावनांचे दाटले रान
कंठाशी साठले प्राण
ये जवळी : वाट बघवत नाही
अमित जहागीरदार
११ मे २०१९
No comments:
Post a Comment