फुलांची बरसात
वेड आम्हा लागले तुझेच गीत गात राहणे
दिवस वाळका तसाच येतो अन काळोखाने रात जाळणे ।।
घन निळे आकाश , लाल झाली किनार
तू दिसली अन छेडली मनाची तार
अन दु:ख विरून गेल हळूच घडले घडले कात टाकणे ।।
तू प्राण होतीस श्वास सगळे चोरले
नयनांनी अपुल्या स्वप्न सुखाचे देखिले
भेटणे क्वचित घडले त्यात मिलनाची बात टाळणे ।।
आम्ही जिरलो मातीत तिथे तुझा गंध यावा
जगणे शिकवले रंग दिला तूच नवा
जमले का प्रिये तुला डोळ्यातून फुलांची बरसात करणे ।।
- अमित जहागीरदार
१४ जानेवारी २००५
पुणे