मन हे माझे तुझे वेडे तुझी वाट बघते
या वेड्याला सांगू कसे
वाटेवरती साथ बदलते ।।
त्या शपथा अन ते वचन
दोन जीवांचे एकच मन
पण दिसता हित क्षणात वेडे हात बदलते
मन हे माझे वेडे तुझी वाट बघते ।।
तुझ्या मनाचे आवेश निराळे
भूक किती हे कधी न कळे
जागून मिठीत तुझ्या रात जळते
मन हे माझे वेडे तुझी वाट बघते ।।
- अमित जहागीरदार
ऑक्टोबर २०१५, पुणे
पण दिसता हित क्षणात वेडे हात बदलते
मन हे माझे वेडे तुझी वाट बघते ।।
तुझ्या मनाचे आवेश निराळे
भूक किती हे कधी न कळे
जागून मिठीत तुझ्या रात जळते
मन हे माझे वेडे तुझी वाट बघते ।।
- अमित जहागीरदार
ऑक्टोबर २०१५, पुणे
No comments:
Post a Comment