मनातल गाणं धुंद गाव गाणाऱ्यांनी
प्रेम कराव बिनधास्त! प्रेम करण्याऱ्यांनी।।
ऊन तिरप झेलण्याऱ्या गवताच्या वाटेत
किंवा एखाद्या झाडाखाली मोगऱ्याच्या बागेत
तिला समोर ठेवून नुसत बोलायचं डोळ्यांनी ।।
प्रेम कराव बिनधास्त! प्रेम करण्याऱ्यांनी।।
किंवा एखाद्या झाडाखाली मोगऱ्याच्या बागेत
तिला समोर ठेवून नुसत बोलायचं डोळ्यांनी ।।
प्रेम कराव बिनधास्त! प्रेम करण्याऱ्यांनी।।
वाट तिची बघत झाडाखाली झुराव
दिसताच ती, अलगद वाऱ्यावरती उडाव
क्षितीज गाठाव जेव्हा बळ दिल असत स्वप्नांनी ।।
प्रेम कराव बिनधास्त! प्रेम करण्याऱ्यांनी।।
ती- तिचा चेहरा दिसतो सगळी कडे
मन तेव्हा कस पाखरू होवून उडे
आकाशाला गाठाव प्रेमाचे पंख लावून उडणाऱ्यांनी||
प्रेम कराव बिनधास्त! प्रेम करण्याऱ्यांनी।।
पावसाचा थेंब कळतो कुणावर प्रेम केल्यावर
श्रावणही निरस वाटतो तिला मिठीत घेतल्यावर
चातकाच रूप घ्यावं ढग दिसलेत कि भिजणाऱ्यांनी
।।
प्रेम कराव बिनधास्त! प्रेम करण्याऱ्यांनी।।
-अमित जहागीरदार
१८-११-२०००
सांगली
No comments:
Post a Comment