दाटलेला कंठ घेवुनी
शोधतोय आता गाव नवेसावरणे कसले मग
बघ ! टाकलेत त्याने डाव नवे ||
तुला मारलेली हाक माझी
मलाच ऐकू आली कधीमी माझे विसरुनी गेलो
तुझेच मजला नाव नवे ||
दू:ख तेव्हाचे दू:ख
होते
प्रेम तेव्हाचे सुख
होते
पण मनावर पडतात अचानक प्रेमाचेच हे घाव नवे ||
हे विसरणे- आठवणे रोज रोज
डोळ्यात असावे रोज रोजफुले नवी उमलली भोवती
कोमेजणारे मनात हे प्रभाव नवे ||
या जगण्यातला श्वास तू
झालीस आता फक्त भास तू
वेदना माझ्या कळल्याच
नाहीउमगले प्रेमाचे ‘भाव’ नवे ||
या वेडात मी जगतांना
नवे दू:खाचे गीत गातांना मनात एक उमेद आली
बघ ! सुखाचे घेराव नवे ||
अमित जहागीरदार
५ फेब्रु २००८
No comments:
Post a Comment