Friday, April 11, 2014

व्यथा


रोज आठवूनी नाव तुझे
रडणे जमणार नाही मला
तू गेलास निघूनी जेव्हा
जगणे उरणार नाही मला ||

आठवले ते क्षण ओले
तुझ्या माझ्या मिठीत झाले
ते क्षण टोचतात पण
दुखणेच कळणार नाही मला ||

आकाशाचे प्रेम मी दिले तुला
श्वास तू होता असे दिले तुला
आज अडकला जीव कुठे
अन गवसणार नाही मला ||

सूर्यास्त तो क्षितिजावरी
वाट ती दूरची जाणारी घरी
हातात हात घेवुनी चाललो
पायास रुतणार नाही मला ||

अरे काय तुझ्या होत्या व्यथा
वाटले प्रेम अन आयुष्य व्यथा
एवढेच का राहिले होते आपुल्यात
जाळणे प्रेमाला कळणार नाही मला ||

- अमित जहागीरदार
  ७ जाने २०१०

No comments:

Post a Comment