Friday, April 11, 2014

का निघून गेलीस तू

श्रावणातल्या सरींना घाम फुटावा अशी तू
ऊन फुटले पहाटेचे अन नारंगी झाली तू ||

कळलेच नाही तेव्हा भाव तुला माझ्या नजरेतला
दिसताच डोळ्यात माझ्या रूप तुझे लाजली तू ||

या मोकळ्या केसांना रेश्मी श्वास पडले
अन रोज स्वप्नात माझ्या रात्र रात्र जागली तू ||

मी क्षणात उडूनी जातो देह माझा विरून गेला
हातात हात घेवुनी जेव्हा डोळ्यांनीच बोललीस तू ||
 
जगावल्या रात्री चांदण्याच्या कुशीत
माझी म्हणूनी आली अश्या स्वप्नांच्या रात्री तू ||

आज फक्त देह उरला श्वास झालेत फक्त वारा
प्राण हरवला माझा अशी का निघून गेलीस तू ||

-अमित जहागीरदार
  २३ डिसेंबर २००९

No comments:

Post a Comment