थांब ना सख्या! रात्र उश्याशी हरवून जाईन
हे भास नवनवे मी तूझ्यात मिसळून जाईन ||
हे भास नवनवे मी तूझ्यात मिसळून जाईन ||
कधी माझे कधी तुझे
नवे जुने तेच बहाणे
सोस चंद्राची किरणे पहाट मग थांबून जाईन ||
नवे जुने तेच बहाणे
सोस चंद्राची किरणे पहाट मग थांबून जाईन ||
स्पर्श तोच ना असतो तुझा
नवा कसा मग भासतो मला
अंगावरी तुझ्या स्पर्शाची नक्षी रंगून जाईन ||
नवा कसा मग भासतो मला
अंगावरी तुझ्या स्पर्शाची नक्षी रंगून जाईन ||
हे न असे घडणार पुन्हा
न ऐकले न दिसले कुणा
गंध अपुल्या मीलनचे गुपीत सांगून जाईन ||
न ऐकले न दिसले कुणा
गंध अपुल्या मीलनचे गुपीत सांगून जाईन ||
भासतोस माझेच एक रूप तू
तहान तू माझी अन् भूक तू
एक होवू असे श्वास श्वासांत गुंतून जाईन ||
तहान तू माझी अन् भूक तू
एक होवू असे श्वास श्वासांत गुंतून जाईन ||
-अमित जहागीरदार
१५ मार्च २०१८
पूणे
१५ मार्च २०१८
पूणे
No comments:
Post a Comment