बंध
कळलेच ना काय काळजात चालले
कोणती हि कंपने काय मनात धावले ।।
कोणती हुरहूर घेऊनी
दिवस आला उगवूनी
आरश्यात आज का रूप माझे सजवले ?
गंध नवा माझ्यात
श्वास भिनलंय श्वासात
वाटते मज नवे आकाश आज गवसले ।।
तू येणार तू बघणार
तूच तू अन मीच मी उरणार
तू होणार मी मग मागे काय उरले ?
देह माझा तुझ्याच साठी
श्वास घेते तुझ्याच साठी
बंध जन्माचे अपुले साक्षीला हात हातातले !
- अमित जहागीरदार
५ जुलै २०१०
कळलेच ना काय काळजात चालले
कोणती हि कंपने काय मनात धावले ।।
कोणती हुरहूर घेऊनी
दिवस आला उगवूनी
आरश्यात आज का रूप माझे सजवले ?
गंध नवा माझ्यात
श्वास भिनलंय श्वासात
वाटते मज नवे आकाश आज गवसले ।।
तू येणार तू बघणार
तूच तू अन मीच मी उरणार
तू होणार मी मग मागे काय उरले ?
देह माझा तुझ्याच साठी
श्वास घेते तुझ्याच साठी
बंध जन्माचे अपुले साक्षीला हात हातातले !
- अमित जहागीरदार
५ जुलै २०१०
No comments:
Post a Comment