हाक…
शब्द गोठले कंठात, हाक ना मी मारली होती
तू मागे वळून पहिले अन मिठी माझी खुली होती ।।
मी जगलोच कुठे जेवढे जगायाचे होते
मी फ़ुललोच कुठे जेवढे फुलायचे होते
स्पर्शाने तुझ्या आत्ता कळी एक फुलली होती ।।
तो पूल नदीवरचा तो सागरी किनारा
गंध तुझा घेवूनी वाहणारा वारा
जागवलेल्या रात्रीची चांदणी एक उरली होती ।।
यावे तू स्वप्नात अन दिवस माझा शुभ्र व्हावा
मरगळलेल्या मनावरी चैतन्याचा अभ्र व्हावा
कहाणी सारी माझी भोवती तुझ्या गुंफलेली होती ।।
का व्हावे असे? हातातले हात सोडणे
वचन सात जन्माचे अन अर्ध्यात साथ सोडणे
आयुष्याच्या वजाबाकीची का गणिते मांडली होती ।।
मी शोधले तुझ्यात अर्थ माझ्या जीवनाचे
मी गाडले कितीतरी प्रश्न माझ्या मनाचे
धावलो मागे पण तू वळणावर पुढल्या वळली होती ।।
-अमित जहागीरदार
पुणे
१४ सप्टेंबर २०१३

No comments:
Post a Comment