अवसेचा दिस
दिवे लागले अंधाराचे, मी वाट शोधत होतो
दिस उगवला अवसेचा मी रात्र चोरत होतो ।।
हे अंग तुझं गोर
अन केस काळे भोर
मी पहिले कितीदा ! नजरेला रोखत होतो ।।
तू यावे अन व्हावे
माझे तुझे दावे
तू आणतेस चंद्र अर्धा, मी पूर्ण त्याला म्हणत होतो ।।
या उदास आकाशाला
बांधून फुलांच्या माळा
दिन रात तुला आठवूनी रोज तुला विसरत होतो ।।
दिस उगवला अवसेचा मी रात्र चोरत होतो ।।
- अमित जहागीरदार
५ ऑगस्ट २०१५
दिवे लागले अंधाराचे, मी वाट शोधत होतो
दिस उगवला अवसेचा मी रात्र चोरत होतो ।।
हे अंग तुझं गोर
अन केस काळे भोर
मी पहिले कितीदा ! नजरेला रोखत होतो ।।
तू यावे अन व्हावे
माझे तुझे दावे
तू आणतेस चंद्र अर्धा, मी पूर्ण त्याला म्हणत होतो ।।
या उदास आकाशाला
बांधून फुलांच्या माळा
दिन रात तुला आठवूनी रोज तुला विसरत होतो ।।
दिस उगवला अवसेचा मी रात्र चोरत होतो ।।
- अमित जहागीरदार
५ ऑगस्ट २०१५
No comments:
Post a Comment