दिसताच तू मजला माझा प्राजक्त होतो
वाहून तुला सारे मी पुन्हा आसक्त होतो
घेतले श्वास किती
मोजण्याची ना मती
तुझ्यात विरून मी असा रिक्त होता
किती झुरावे तुझ्यासाठी
किती फुलावे तुझ्यासाठी
बंधनात अडकून या मी मुक्त होतो
दिसतो तुझा चेहरा
बघता आरास खरा
रूपात तुझ्या मी आता व्यक्त होतो
- अमित जहागीरदार
२७ जून २०२२