गुरुपौर्णिमा
असे जो सगळ्यांच्या नीज
न्यारीच त्याची रीत
मन भेदी
चंबळ घाटाची जडण
वृंदावनीची जोडणं
मग नवे रसायन
निघे त्यातून
मनाचे विकार
कसे न्यावे पार
त्याचा अधिकार
ऐकावे आपण
किती ते शिष्यगण
किती कौतुकाचे धन
किती ठेवी साधे मन
भोवती मायाजाल
आम्ही असो बापुडे
कुणा काय काय मिळे
स्नेह न तसूभर ढळे
मागणे हेच
तुम्ही गुरु दाखवा दिशा
दिला मंत्र दिला आरसा
असेच नेहमी असा आणि हसा
नको काही
अमित जहागीरदार
४ सप्टेंबर २०२१
१५:३५