हातावरल्या रेषा
ये अशी स्वप्नात माझ्या तेवढीच भेट होते
कधी हातांची कधी नजरेची वा थेट होते ।।
पाहिलेस माझ्याकडे रागाने तू कित्येकदा..
लाडिक नजरांनी तुझ्या मग समेट होते ।।
येत नाहीस तू अन मनात दाटते काजळी
येऊन चिंब करणारी तू की नभात मेघ होते ?
आठवणीत तुझ्या फेसाळणारा सागर झालो
चाललो इतके जरी काटे तुझ्या वाटेत होते ।।
धन्य झालो जेव्हा तुला पाहिले आम्ही
प्रेम हे असले कुठे हातावरल्या रेषेत होते ।।
-अमित जहागीरदार
६ डिसें २०१८
पुणे