नवी वाट
सांजवेळी आलीस तू अन माझी पहाट झाली
सूर हरवले होते माझे तू नवे गीत गात आली ।।
ह्या मनात माझ्या एक होता वाळवंट
कोरडे चहूकडे, दु:ख आणिक खंत
फुलून यावे सर्व दिशांनी अशी तू बरसात झाली ।।
वाट पहिली ज्याची ते क्षण दाटून आले
तृप्त जाहलो मी अन मन बहरून आले
सखा मी झालो त्या तारकांची उगवून रात अली ।।
तू येशील ! हे ठाऊक होते
प्रेम हे जरी माझे मूक होते
मी शब्दांचा सागर अन तू स्पर्शाची होऊन लाट आली ।
मी माझा होण्यासाठी
मी तुझ्यात मिसळण्यासाठी
एक होऊन पुढे जाण्यासाठी पायात नवी वाट आली ।।
- अमित जहागीरदार