रुसणे …
हिरमुसलो जरी तुझ्यावरी, तसा रुसलो नाही
चिडलो जरी तुझ्यावरी, तसा दुरावलो नाही
क्षणाचा अबोला, क्षणाचे वादळ
एकही क्षण प्रीतीचा विसरलो नाही ।।
हे भोवतालचे पसारे आणि कामाचे व्याप
रोमांच कधी अंगावरी !कधी भीतीचे थरकाप
भावनांना गंज चढला, मनातुनी कोमेजलो नाही ।।
दिस येतो अन जातो, यंत्रवत मी पाळतो
संध्येला अर्ध्य उत्साहाचे अन उश्याला उमेद घेतो
पण मिठीत आलो तुझ्या कि वाटे मी तसा जगलो नाही ।।
- अमित जहागीरदार
२६-०३-२०१६
पुणे