Saturday, January 9, 2016

उमेद

उमेद

ठरवल तर बघ दिसतो तसा चंद्र ही सुंदर
पण तुला ठाऊक आहे ना,आहेत  तिथे डोंगर अन् विवर ।।

"रित्या" पेल्याच दुःख वाचलय आपण
"भरला" अस त्याला कित्येकदा म्हटलय आपण
तू बघणारच नाहीस पेल्याकड, अशी पण येईल सर ।।

या जीवनाने कधी शिकवले का नियम
आजच का मग रडायच जर दिला थोडा "गम"
तू तुझ्या सोबत आहेस! कुणीही नसलं तर ।।

वाट कठीण असली तरी वाट आहे ना
थकलीस आज पण वाटेवरून जात आहेस ना
ठेव विश्वास, जसा असतो रात्रीचा पहाटेवर ।।

मला सुचलेले हे दोन बोल
ठरलेत तुला आधार देण्यास जरी फोल
उमटेल ना एक स्मित तुझ्या ओठांवर ।।

अमित जहागीरदार
५ जुन २००७

जगण्याचे स्वप्न

जगण्याचे स्वप्न

रंग आला आयुष्याला जेव्हा तुला पाहिले
पाहणे नव्हतेच नुसते जगणे आम्हा समजले ।।


नयनात तुझ्या चैतन्य वसते
केशी जाईच सुगंध वेचते
त्या नजरेची धिटाई अन आमचे काव्य घडते ।।

जगण्याचे स्वप्न

स्पर्श तुझा होतो जेव्हा
अर्थ मिळे जगण्याला
चांदण्यांचे आकाश आम्ही बहुवरति पांघरले

तू दिसावी तू असावी
नित्य अमुच्या जवळी
सर्व आकांक्षा लोपल्या मागणे हेचि उरले ।।

तो कटाक्ष चोरटा
त्या गालावरी लटा
तो हात जो दूर करी त्यांने गीत मनात छेडले ।।

दुख  नाहीसे झाले
मनात फुलली फुले
तुज सवे जगण्याचे स्वप्न एक मी पहिले ।।


अमित जहागीरदार
१४ फेब्रुवारी २००५

फुलांची बरसात

फुलांची बरसात

वेड  आम्हा लागले तुझेच गीत गात राहणे
दिवस वाळका तसाच येतो अन काळोखाने रात जाळणे ।।

घन निळे आकाश , लाल झाली किनार
तू दिसली अन छेडली मनाची तार
अन दु:ख विरून गेल हळूच घडले घडले कात टाकणे ।।

तू प्राण होतीस श्वास सगळे चोरले
नयनांनी अपुल्या स्वप्न सुखाचे देखिले
भेटणे क्वचित घडले त्यात मिलनाची बात टाळणे  ।।

आम्ही जिरलो मातीत तिथे तुझा गंध यावा
जगणे शिकवले रंग दिला तूच नवा
जमले का प्रिये तुला डोळ्यातून फुलांची बरसात करणे ।।

- अमित जहागीरदार
  १४ जानेवारी २००५
  पुणे